शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: इस्लामाबाद , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:49 IST)

वीणा मलिकला 26 वर्षे कैदेची शिक्षा

पाकिस्तानात अभिनेत्री वीणा मलिक हिच्यासह तिच्या पती आणि एका प्रतिष्ठीत मीडिया ग्रुपचा मालकाला 26 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
 
जियो टीव्हीचा मालक शकील उर रहमानसह वीणाचा पती आहे. वीणा आणि शकील याला दहशतवादविरोधी कोर्टाने ईशनिंदेप्रकरणी दोषी ठरवले आहे. जियो टीव्हीवर हा आक्षेपार्ह कार्यक्रम मे महिन्यात प्रसारित झाला होता. त्यात एक धार्मिक गाणे प्रसारित करण्यात आले होते.
 
न्यायाधिश शाबाज खान यांनी टीव्ही होस्ट शाइस्ता वाहिदी हिला देखील 26 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.तसेच  सर्व दोषींना 13 लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड भरला नाही, तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.  
 
दरम्यान, जियो टीव्ही चा मॉर्निंग शो 'उठो जागो पाकिस्तान' शाइस्ता लोधी होस्ट करते. या शोमध्ये वीना मलिकच्या मेहंदी आणि लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात एका म्युझिक बँडने सुफी गाणे गायले होते. त्यामुळे कट्टपंथी संघटना नाराज झाल्या होत्या. ते गाणे होते, 'अली के साथ है जहरा की शादी'. त्यावेळी उलेमा पॅनलने तर जियो टीव्ही पाहाणे देखील 'हराम' असल्याचे म्हटले होते. एआरवाय न्यूज अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार मुबाशिर लुकमान यांनी या शो आणि लग्नातील गाण्याचा जोरदार विरोध केला होता.