1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (11:42 IST)

'शराबी'वरून शाहरूखला नोटीस

बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला गोळा करणार्‍या 'हॅपी न्यू इअर' चित्रपटाचा नायक शाहरूख खान अडचणीत सापडला आहे. चित्रपटातील गाणे शराबीवर आपले स्वामित्व हक्क असल्याचा दावा करत गायक सुर्ज याने शाहरूखच्या रेड चिलिस प्रोडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.माझी परवानगी न घेता 'शराबी' हे गाणे चित्रपटात वापरण्यात आले आहे. आरडीबी ग्रुपने २0१२ मध्ये हे गाणे रिलिज केले होते आणि त्याचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा सुर्जने केला आहे. आरडीबीच्या माजी सदस्याने खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने या गाण्याचे हक्क रेड चिलिसला विकल्याचे सुर्जचे म्हणणे आहे. या गाण्याचे स्वामित्व द्यावे किंवा चित्रपटातून ते वगळण्यात यावे, अशी मागणी सुर्जने केली आहे.