शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (10:32 IST)

संघाला भावला अक्षयचा ‘एअरलिफ्ट’

प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ही अक्षयकुमारच्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटाला मिळालीच आहे. पण या चित्रपटाचे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील कौतुक केले आहे. भारताच्या खर्‍याखुर्‍या चैतन्याचे प्रतिबिंब एअरलिफ्ट हा देशभक्तिपर चित्रपटात पाहायला मिळत असल्याचे संघाने म्हटले आहे.
 
कुवेतमध्ये अडकलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांची भारत सरकारच्या मदतीने कशी थरारक सुटका करण्यात आली, यावर हा चित्रपट आधारित असून सद्दाम हुसेनने युद्ध पुकारल्यानंतर परक्या भूमीत भारतीय असल्याची ओळख विसरलेले नागरिक कशाप्रकारे भारतीयत्व जोपासत एकत्र आल्याचे मांडण्यात आले आहे.
 
या चित्रपटाचा रा. स्व. संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्राच्या संपादकीय लेखात दाखला देत, जर देशातील सर्व नागरिक एकत्र आले तर भारत किती बलाढ्य होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. एका देशाचे नागरिक म्हणून