शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2015 (09:09 IST)

सनीबाबत ‘ही’ माहिती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणार्‍या बेबी डॉल अर्थात सनी लिऑनचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर आहेत. सनी लिऑनच्या बाबतीतील आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, सनी लिऑनला दररोज जवळपास 10 सिनेमांच्या ऑफर मिळतात. याबाबत अभिनेत्री सनी लिऑनने स्वत: खुलासा केला आहे. सनीने 2012 मध्ये जिस्म सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका करुन सनी लिऑनने बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक स्थान निर्माण केलं आहे. बेबी डॉल सनी लिऑनचे म्हणणे आहे की, तिला रोज किमान 5 ते 10 सिनेमांची ऑफर मिळते. मात्र, सिनेमाची कथा वाचूनच सनी लिऑन सिनेमा करण्याबाबत निर्णय घेते. सिनेमाची कथा आवडल्यास सिनेमा करण्यावर सनी विचार करते. नुकताच येऊन गेलेला ‘कुछ कुछ लोचा है’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. मात्र, तरीही सनीच्या स्टारडमला कसलाही धक्का लागला नाही.