शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (11:59 IST)

सलमान पती बनावा : सानिया

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाची इच्छा आहे की, सलमान खान तिचा पती बनावा. हे वाचून धक्का बसला असेल तर थांबा. कारण सानियाला सलमान खान पती म्हणून रिअल लाईफमध्ये नाही तर रील लाईफमध्ये हवाय. ‘माझ्या जीवनावर जर सिनेमा बनला तर सलमान खानने पतीची भूमिका साकारावी,’ अशी सानिया मिर्झाची इच्छा आहे. बॉलिवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनत आहेत. या आधी मिल्खा सिंग, मेरी कोम यांच्यावर चित्रपट बनले होते. आता महेंद्रसिंग धोनी, मेजर ध्यानचंद यांच्यावर सिनेमा होणार आहे. सानियाने एका कार्यक्रमात तिची इच्छा बोलून दाखवली. ‘जर माझ्या आयुष्यावर चित्रपट बनला तर दीपिका पदुकोणच माझ्या व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय देऊ शकेल. तर पती शोएब मलिकची भूमिका सलमान खानने साकारावी. सलमान खान माझा चांगला मित्र आणि आवडता अभिनेता आहे. मी मोठय़ा पडद्यावर दीपिका आणि सलमानला एकत्र पाहिलेलं नाही. त्यामुळे दोघांना सोबत पाहणं ही दोघांच्याही चाहत्यांना मेजवानीच असेल.’, असं सानिया म्हणाली.