शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2016 (14:07 IST)

सैफच्या परवानगीनेच करीनाचा ‘हॉट किस’

‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटात बेबो अर्थात करीना कपूरने अर्जुन कपूरला दिलेला हॉट किस सैफ अली खानच्या परवानगीनेच दिल्याचा खुलासा अर्जुनने केला आहे. विशेष म्हणजे या किस सिन पाहून सैफ अली खान माझ्यावर नाराज नाही, असं अर्जुन कपूरने स्पष्ट केलं आहे. 
 
आर बाल्की दिग्दर्शित ‘की अ‍ॅण्ड का’मध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आलं. त्यावेळी पत्रकारांनी अर्जुनला सिनेमातील किसबाबत विचारलं. यावर अर्जुन म्हणाला की, सैफ अली खान माझ्यावर नाराज नाही.
 
अर्जुनने त्याचा मोबाईल काढून सैफ अली खानचा मेसेज मीडियासमोर वाचून दाखवला. मेसेज वाचल्यानंतर अर्जुन म्हणाला की, पर्सनल मेसेज सार्वजनिक ठिकाणी वाचणं चुकीचं आहे, पण अभिनेता एकमेकांशी भांडत नाहीत, असं सांगणंही गरजेचं आहे.