शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सैराट बाहुबलीपेक्षा सरस

कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमधील सर्वच विक्रम गतवर्षी आलेल्या बाहुबली चित्रपटाने मोडीत काढले तर यंदा ‘सैराट’ने मराठीतील सर्व विक्रम मोडीत काढले. या दोन चित्रपटांची तुलना केली तर निर्मितीमूल्य आणि मिळालेला नफा यात ‘सैराट’च खरा बाहुबली असल्याचे सिद्ध होते. 
 
सैराट चित्रपटावर 4 कोटी रुपये खर्च झाले तर या चित्रपटाने 9 दिवसात 50 कोटींचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे बाहुबली या चित्रपटावर 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या चित्रपटाने 9 दिवसात 300 कोटींचा रग्गड गल्ला जमवला. म्हणजेच सैराट नफ्याच्या तुलनेत 12 पट पुढे आहे.
 
दरम्यान सैराट या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांना जास्त खर्च करवा लागला नाही. कारण सैराटची प्रसिद्धी तोंडी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणावर झाली. तर दुसरीकडे बाहुबलीच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांना कोटी रुपये ओतावे लागले. बाहुबलीसाठी भव्यदिव्य सेट उभारण्यात आले आणि सैराटसाठी याप्रकारचा कोणताही खर्च करण्यात आला नाही. बाहुबलीसाठी कला दिग्दर्शकांना खूप मेहनत घ्यावी लागली, तर सैराटचे चित्रीकरण गावखेडय़ात झाल्यामुळे सैराटचा हा खर्च देखील वाचला. 
 
त्याचप्रमाणे बाहुबलीमध्ये नामांकित कलाकार होते त्यामुळे त्यांचे मानधन देखील त्यांच्या बेताचेच होते आणि सैराटमध्ये नवोदित कलाकार असल्यामुळे त्यांचे मानधन त्यांच्याच हिशेबाचे होते. एवढे सगळे करूनही बाहुबलीने आपल्याला दिले फक्त मनोरंजन आणि सैराटने दिला सामाजिक संदेश. तर आता तुम्हीच ठरवा की कोण सरस?