शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘सैराट’मधून काही तरी शिका: इरफान खान

सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून लौकिक मिळवलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने बॉलिवूडला यापूर्वीची मोहिनी घातली आहे. आमिर खान, रितेश देशमुख अशांनी ‘सैराट’चे कौतुक केल्यानंतर आता बॉलिवूडचा गुणी अभिनेता इरफान खान याने थेट सैराटचे स्पेशल स्क्रिनिंगचे मुंबईत आयोजन केले. 
 
या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील इरफानचे जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी इरफान खान म्हणाला, ‘हॉलिवूडच्या सिनेमांशी स्पर्धा करण्याचे बळ ‘सैराट’ सारख्या सिनेमांतून मिळणार आहे. बॉलिवूडचे सिनेमे ‘मासेस‘पर्यंत पोहोचत नाहीत. ते ‘सैराट’ने करून दाखवले. याकडून नक्कीच बॉलिवूडने धडा घेतला पाहिजे. ‘कंटेट’च्या पातळीवर आंतरराष्ट्रीय सिनेमांशी स्पर्धा करायची असेल तर ‘सैराट’चा धडा सगळ्यांनीच घेतला पाहिजे. ‘मराठी सिनेमांचे इरफानने कौतुक करत मराठी सिनेमा दरवर्षी एक तरी षटकार मारतो असे कौतुक त्याने केले आहे. इरफान म्हणाला, ‘पहिलावहिला सिनेमा यशस्वी आणि सुपर हीट दिल्यानंतर दुसरा सिनेमाही असाच सुपरहीट बनवणे शक्य होत नाही. पहिल्या सिनेमाच्या निर्मितीतच त्या दिग्दर्शकाचा सर्व खजिना रिक्त झालेला असतो. पण नागराजने दुसरा सिनेमाही सुपरहीट देऊन स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे.’ 
 
या सिनेमाला बॉलिवूडचे नामवंत आणि कल्पक दिग्दर्शक तिगमांशू धुलियाही उपस्थित होते. ‘बॉलिवूडङ्कध्ये आम्ही काय करत आहोत? बॉलिवूडने ङ्कराठीतून काही तरी धडा घेतला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.