testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विशाल 'कमीना' आहे- प्रियंका चोप्रा

अभिनय कुलकर्णी|
IFM
IFM
विशाल भारद्वाजच्या 'कमीने'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. यात मराठी मुलीच्या भूमिकेतील प्रियंका चोप्राचे चांगलेच कौतुक होते आहे. यासंदर्भातच तिच्याशी केलेली ही चर्चा.

विशालने 'कमीने' असं चित्रपटाचं नाव सांगितलं, त्यावेळी काय वाटलं?
-मला वाटलं की विशाल गंमत करतोय. पण नंतर लक्षात आलं की तो गंभीर आहे. अशा तर्‍हेची नावं तोच ठेवू शकतो. मला वाटतं की आमच्या सगळ्यांत तो सर्वांत मोठा 'कमीना' आहे. हे त्याच्या कामातही दिसतं.

या नावाला गुलजार यांनीही पसंती दिली होती. - हो. विशाल गुलजार यांचा मोठा चाहता आहे. गुलजार यांची स्वीकृती मिळाल्यानंतर या शीर्षकाविषयी असलेल्या शंका-कुशंका मोडीत निघाल्या.

'कमीने' हा शब्द बहुवचनी आहे. याचा अर्थ फक्त शाहिदच नव्हे तर सगळ्यांच तो लागू आहे काय?
- खरं तर या चित्रपटातील प्रत्येक जण 'कमीना' आहे. फक्त एक सोडून.
तो कोण?
- ते चित्रपट पाहून तुम्हीच ठरवा.

चित्रपटाच्या नावाबद्दल अनेकांना आक्षेप आहे.
- कमीना ही काही फार मोठी शिवी नाही. आपण रोजच्या जीवनातही कित्येकदा 'कमीना' असे म्हणत असतोच. शिवाय धर्मेंद्रजींची तर आख्खी करीयर या शब्दावरच उभी आहे.
कमीनेच्या सादरीकरणाविषयी बरेच काही बोलले जातेय.
- मला वाटतं हा विचार आपण करू नये. प्रेक्षकांना काहीच कळत नाही हे आपण समजू नये. हॉलीवूडचे चित्रपटही हेच प्रेक्षक पहातात. त्यांना सगळ्याच गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागत नाही. कमीने बनविणार्‍या टिमलाही हीच अपेक्षा आहे. आपण लोकांना 'बिनडोक' समजता कामा नये. त्यांना खूप काही कळतं.
मराठमोळी प्रियंका इथे पहा.


यावर अधिक वाचा :

गांधीजींचा फोटो कशाला लावतात ? यावर हुशार विद्र्थ्र्याचे ...

national news
गुरुजी- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ? गण्या - खिळ्याला

अनुष्का साकारणार जयललितांची भूमिका

national news
बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा ...

सुबोध श्रुतीचे 'ओ साथी रे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

national news
सनई-चौघडे,वरात घाई,नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा ...

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...