testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनही शून्यावर बाद होतोच की- अक्षय

चंद्रकांत शिंदे

वेबदुनिया| Last Modified गुरूवार, 18 नोव्हेंबर 2010 (12:21 IST)
अक्षय कुमारचा नवीन चित्रपट तीस मार खां लवकरच प्रदर्शित होत आहे. यापूर्वी अक्षयचे सारे चित्रपट आपटले आहेत. नवीन चित्रपटाचे ऑडिओ रिलीज नुकतेच मुंबईमध्ये ट्रेनमध्ये करण्‍यात आले. या दरम्यान अक्षयने वेबदुनियाशी मारलेल्या गप्पा.अक्षयच्या मते प्रत्येकाच्याच आयुष्यात बॅडपॅच असतोच.

तीस मार खां ट्रेनमध्ये काय करतोय?

तीस मार खां ट्रेनमध्ये चोरी करण्‍यासाठी आला आहे. या चित्रपटातील चोर हा प्रामुख्याने ट्रेनमध्ये चोरी करत असतो. त्याची खासीयत म्हणजे तो तुमचेच सामान तुमच्या डोळ्यापुढून गायब करतो.

ट्रेनमध्ये काय चोरी करणार?
जर मी आताच तुम्हाला या विषयी सांगितले तर तुम्हाला चित्रपटाविषयी उत्सुकता रहाणार नाही. तीस मार खांला ट्रेनमध्ये डाका टाकत एंटीक पिस चोरी करण्‍याचे काम सोपवण्‍यात आले असते. तो हे काम कसे करतो, काय करतो, हे क्लायमॅक्समध्ये कळेलच.

अक्षय ट्रेन मधून कधी तुझे सामान चोरीला गेलेय?

हो. मी साधारण 14 वर्षांचा असेल. या दरम्यान मी मुंबईत काम करत होतो. मी कमावलेल्या 650 रुपयांच्या कमाईत मी फॅशन स्ट्रीटवरुन कपडे खरेदी करुन दिल्लीला जात असताना, अचानक ट्रेनमध्ये डाका पडला. या दरम्यान लूटारुंनी माझी बॅग माझ्या डोळ्यापुढ्यात नेली. तेव्हा मला खूप वाईट वाटले. यानंतर मात्र कधीही अशा प्रकारे माझे सामान गेले नाही.
सिंग इज किंग नंतर तुझा एकही चित्रपट चालला नाही?

असं नाही. हाऊसफुल्लला तुम्ही विसरलात वाटतं, हा चित्रपट चांगला चालला. यानंतर मात्र दीपावली दरम्यान एक्शन रिप्ले रिलीज झाला. हा प्रेक्षकांना आवडला नाही हे मात्र खरे. काही चित्रपट यशस्वी होतात, तर काही आपटतात. सचिनही शून्यावर बाद होतोच की. सचिन कधी शतक ठोकतो, कधी झिरोवर आऊट होतो. मात्र त्याला कुणीही शून्यावर का बाद झाला म्हणून विचारत नाही. माझश चित्रपट मात्र आपटल्यावर मला विचाणार्‍यांची संख्या जास्त असते? असं का?
चित्रपट निर्मितीमध्ये तुझे योगदान?

मला सोपवलेले काम मी करत असतो. मी फक्त फायनांन्स पूरवत असतो. कोण आले, कोण गेले, अशा दैनंदिन कामात मी लक्ष घालत नाही. असे केले तर माझ्या कामावर त्याचा परिणाम होईल. म्हणून मी अशा बाबींकडे फारसे लक्ष देत नाही. प्रत्येक कामासाठी एक माणूस अपॉईंट केला असल्याने मी याकडे दुर्लक्ष करत असतो.
कथा आणि दिग्दर्शनात लक्ष?

कथेचे म्हणाल तर कथा चांगली असल्याशिवाय मी चित्रपटांची निवडच करत नाही. आणि दिग्दर्शकांचे म्हणाल तर माझ्यासोबत काम करणार्‍या दिग्दर्शकांवर माझा विश्वास असतो, त्यामुळे मी याकडे फारसे लक्ष देत नाही.


यावर अधिक वाचा :

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

national news
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

national news
बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...

जहाँ गम भी न हो

national news
या वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार? पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...

डोळा का सुजलाय?

national news
सोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...