testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुष्मिताशी भांडण नाही- लारा दत्ता

अभिनय कुलकर्णी|
IFM
IFM
दोन माजी विश्वसुंदर्‍या लारा दत्ता आणि सुश्मिता सेन आगामी 'डू नॉट डिस्टर्ब' या चित्रपटातून एकत्र पडद्यावर येताहेत. पण या दोघींचे अजिबात पटत नाही, असा बॉलीवूडमध्ये प्रवाद आहे, असे असताना या दोघींनी एकत्र काम कसे केले याविषयी अजूनही तर्क लढविले जात आहेत. पण यासंदर्भात लाराला विचारले असता, 'आम्हा दोघींमध्ये कोणतीही भांडणे नाहीत,' हे तिने निःसंदिग्धपणे सांगितले. 'सुष्मिता अतिशय गोड आहे आणि तिच्याशी माझं अजिबात भांडण नाही. अशा अफवा प्रसिद्धीसाठी पकवल्या जातात. अशा चर्चांमध्ये फार तथ्य नसते, असे सांगायलाही ती विसरली नाही.

'आपल्या देशात फक्त आम्हा दोघींनाच मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळाला आहे. मग आम्हीच भांडू लागलो तर त्यापेक्षा दुःखाची बाब कोणती असेल? असा सवाल करून सुष्मितासोबत मी पडद्यावर अधिकाधिक काळ दिसावे हीच माझी इच्छा आहे. यापूर्वी आम्ही पडद्यावर एकत्र येऊ शकलो नाही. म्हणूनच आता आलेली संधी खरोखरच चांगली आहे, असे लारा म्हणाली.
कुणाच्या वाट्याला किती वेळाची भूमिका आली यावरून दोघींमध्ये जुंपली असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये पसरली आहे. पण आम्हा दोघींमध्ये सामंजस्य असल्याचे लाराचे म्हणणे आहे. सुष्मितासोबत आणखी पुढेही काम करण्याची तिची इच्छा आहे. डेव्हिड धवन कदाचित हीच करामत पुन्हा घडवून आणतील, असा तिला विश्वासही आहे.

डू नॉट डिस्टर्ब हा डेव्हिड धवन दिग्दर्शित सिनेमा असून यात लारा, सुष्मितासह गोविंदा, रितेश देशमुख, सौहेल खान, रणवीर शौरी आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकेत आहेत.
यात लारा डॉलीच्या भूमिकेत आहे. डॉली अनेकांच्या स्वप्नातली राणी आहे. पण तिचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि ती तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते.


यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...