testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत

buddha purnima
वेबदुनिया|

बौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे. १. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवा.
१. अनिश्वरवाद- बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही. > > २. अनात्मवाद. अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ शकतो आणि अंधारात लीनही होऊ शकतो. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय आत्मवान होता येणार नाही. निर्वाणाच्या अवस्थेतच स्वत-ला जाणून घेता येते. मृत्यूनंतर आत्मा महासुसुप्तिमध्ये गायब होऊ शकतो. अनंतकाळ तो अंधारात पडून राहू शकतो वा लगेचचा दुसरा जन्म घेऊन पुन्हा एकदा जगरहाटीत येऊ शकतो.

३. क्षणिकवाद-
या ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आहे. नश्वर आहे. काहाही कायमस्वरूपी रहाणारे नाही. सगळे काही बदलत जाणारे आहे. शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे रथासारखे आहे. रथाचे घोडे, चाक व पालखी काढून घेतल्यास रथाला अस्तित्व उरणार नाही. तसेच शरीर व ब्रह्मांड परस्परांपासून दूर नेल्यास परस्पर अस्तित्वाला अर्थ उरणार नाही.

वरील तीन सिद्धांत बौद्ध दर्शनाचा पाया आहे. या तीन सिद्धांतातूनच निरनिराळ्या विचारधारा प्रसव पावून सहा उपसंप्रदाय या धर्मात जन्माला आले.


यावर अधिक वाचा :

स्वप्न जे सांगतात धन लाभ की धन हानी होणार आहे

national news
स्वप्न जे सांगतात की धन लाभ होणार आहे की धन हानी : स्वप्न सर्वांनाच दिसतात. त्यातून काही ...

आरती करण्याची पद्धत

national news
करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम ...

दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ

national news
दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची कहाणी )

national news
श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान ...

राशिभविष्य