Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (16:36 IST)
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी १६८० कोटी
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (आयटी) सातत्याने होणारी वाढ पाहून या क्षेत्रासाठी आगामी वर्षांत जवळपास १ हजार ६८० कोटी रूपये देण्यात आले आहेत.
सरकारच्या दूरदर्शीपणामुळे आयटी क्षेत्राचा विकास वेगवान व सातत्य राखून होत असल्याचे सांगायवयास अर्थमंत्री विसरले नाहीत. ते म्हणाले, की ग्रामीण भागात एक लाख ब्रॉडबॅंड इंटरनेट आधारीत सेवा केंद्रांची स्थापना करण्यासाठी एक योजना सुरू करण्यात येणार असून केंद्राच्या सहाय्याने राज्यव्यापी नेटवर्कचीही (स्वान) स्थापना करण्यात येणार आहे. राज्य सांख्यिकी केंद्रांसाठी एका नव्या योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. सेवा केंद्रांसाठी ७५ कोटी रूपये, स्वानसाठी ४५० कोटी रूपये व राज्यव्यापी केंद्रांसाठी २७५ कोटी रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.