testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Live : बजेट सत्र आजपासून सुरू, नोटबंदीवर हंगामा होण्याची शक्यता

budget

>
- सातवा वेतन आयोग लागू झाल्याने ५० लाख कर्मचारी आणि ३५ लाख निवृत्त कर्मचा-यांना फायदा – राष्ट्रपती मुखर्जी
- भारतनेट उपक्रमाअंतर्गत देशातील ७५ हजार ७०० ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर केबलशी जोडणार - राष्ट्रपती मुखर्जी
- स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून सरकार अडीच लाख एससी, एसटी आणि महिला उद्योजकांना मदत करणार – राष्ट्रपती मुखर्जी
- आमच्या लष्कराचा आम्हाला अभिमान वाटतो - राष्ट्रपती मुखर्जी.
वन रँक वन पेन्शनचा प्रश्न केंद्र सरकारने निकाली काढला – राष्ट्रपती मुखर्जी
- यवतमाळ : गेडाम नगरातील पंजाबराव देशमुख विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण, शरीरावर वळ आल्याने संतप्त पालकांची शाळेवर धडक, परिसरात तणावसदृश परिस्थिती.
- काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकराने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतला - राष्ट्रपती मुखर्जी
- सहा लाख दिव्यांगांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
- दिव्यांगांसाठी आरक्षण वाढवून चार टक्के केले - राष्ट्रपती मुखर्जी
- आगरतळा-त्रिपुरा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मार्गांना जोडणार - राष्ट्रपती मुखर्जी
- ३ कोटी किसान क्रेडीट कार्डचे लवकरच रुपे डिबेट कार्ड्समध्ये रुपांतर केले जाईल - राष्ट्रपती मुखर्जी
- देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यास केंद्र सरकार कटीबद्ध आहे – राष्ट्रपती मुखर्जी
- दिनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत तब्बल १६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले – राष्ट्रपती मुखर्जी
- पी व्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले - राष्ट्रपती मुखर्जी
- विविध सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत १३ कोटी गरीबांना सामावण्यात आले आहे - राष्ट्रपती मुखर्जी- काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी सरकारला साथ दिली : राष्ट्रपती मुखर्जी
- २६ कोटी जनधन काती उघडली गेली - राष्ट्रपती मुखर्जी
- जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे जन-आंदोलनात रुपांतर झाले - राष्ट्रपती मुखर्जी
- गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक प्रयत्न केले असून अनेक नव्या योजना आणल्या आहेत - राष्ट्रपती मुखर्जी
- आत्तापर्यंत १.२ कोटींहून अधिक ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन्सचा त्याग केला आहे - राष्ट्रपती मुखर्जी.
- 'सबका साथ, सबका विकास', हेच आमच्या सरकारचं ध्येय - राष्ट्रपती मुखर्जी
- हे ऐतिहासिक अधिवेशन आहे - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
- अर्थसंकल्पीय अधिवेश - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला सुरूवात.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केले सहकार्याचे आवाहन.
- सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्पही पहिल्यांदाच जोडला गेला आहे: पंतप्रधान मोदी.
- नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ससंदेत पोहोचले
- नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवशेनाला थोड्याच वेळात होणार सुरूवात.


यावर अधिक वाचा :