testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Budget live : अरुण जेटली यांचे बजेट 2017-18चे मुख्‍य बिन्दु

budget 17-18

- ५ ते १० लाख उत्पन्न व १० लाखांवरील उत्पन गटासाठी कररचेनत बदल नाही. ते अनुक्रमे २० व ३० टक्के राहणार.
- मध्यमवर्गीयांना करामध्ये सरकारने दिली सवलत.
- जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही.
- 50 लाख ते 1 कोटी करदायित्व असणा-यांना 10 टक्के सरचार्ज लागणार.
- एटीसी अंतर्गत गुंतवणूक केल्यास ४.५ लाख पर्यंत रक्कम असणा-यांवर ० टक्के कर.
- इन्कम टॅक्स स्लॅब : 2.5 ते 5 लाख उत्पन्नावरील करात 50 टक्के कपात, 5 टक्केच कर आकारला जाणार. यापूर्वी १० टक्के कर आकारला जात असे.
- राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डीजीटल माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल.
- राजकीय पक्षांना २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही.
- आता 3 लाखा पेक्षा जास्त व्यवहार रोखीने करता येणार नाही. राजकीय पक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी उचलले पाऊल.
- काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक.
- 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5 टक्के सवलत, 30 टक्क्यावरुन दर कमी करुन 25 टक्के, 96 टक्के कंपन्यांना होणार फायदा.
- कॅपिटल गेन टॅक्सचा अवधी आता २ वर्षांपर्यंत.
- 1.48 लाख खात्यांमध्ये प्रत्येकी 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा. 1.09 कोटी खात्यांमध्ये 2 ते 80 लाखांपर्यंत रक्कम जमा.
- परवडणा-या घराची व्याख्या कारपेट एरियावरुन ठरणार.

- वैयक्तिक प्राप्तीकर महसूलात नोटाबंदीमुळे 34.8 टक्क्यांची वाढ.
- 76 लाख लोकांनी आपले उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे दाखवले.
- काळ्या पैशांविरोधात लढा देणे हीच आमची प्राथमिकता.
- 76 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त दाखवले.
- 99 लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले, परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे, करमुक्त असल्याचे दाखवले.
- कर चुकवणा-या लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांचा भार प्रामाणिकपणे कर चुकवणा-यांवर येतो.
- 24 लाख लोकांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवतात.
- 1 लाख 74 हजार जणांनी आपले उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे.
- संघटित क्षेत्रात 4.1 कोटी कमर्चारी पण 1.74 कोटी कर्मचा-यांनीच रिर्टन फाईल केला.
- नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाली असल्याने पुढील वर्षी महसुली तूट कमी होईल, अशी अपेक्षा.
- सध्या वित्तीय तूट 3.2 टक्के असून पुढच्यावर्षीपर्यंत 3 टक्क्याचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्टय आहे.
- यावर्षी वित्तीय तूट १.९ टक्के.
- देश सोडून फरार झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी विधेयक आणण्याचा विचार.
- संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार ११४ कोटींची तरतूद.
- यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण 21 लाख 47 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
- सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
- आता पोस्ट ऑफिसमधेही तुमचा पासपोर्ट बनवता येणार.
- IRCTCचे समभाग आता विक्रीस उपलब्ध, रेल्वेच्या इतर तीन कंपन्याही शेअर बाजारात येणार.
- रिझर्व्ह बँकेत डिजीटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करणार.
- पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी 2.44 लाख कोटींची तरतूद.
- सरकारी संस्थांमध्ये डिजीटल व्यवहारांना चालना देणार.
- भीम आधारीत डिजीटल व्यवहारांना चालना देणार, आधारच्या माध्यमातून डिजीटल व्यवहाराचे लक्ष्य,यामुळे मोबाईल नसला तरी व्यवहार शक्य, 20 लाख सर्विस टर्मिनल्स उभारण्याचे उद्दिष्टय.
- भीम अॅपच्या प्रमोशनसाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना.
- सौर उर्जेत २३ हजार अतिरिक्त मेगावॉटची क्षमता.
- सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची घोषणा.
- वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद.
- पायाभूत सुविधांसाठी ३.९६ लाख कोटींची तरतूद.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
- PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार.
- 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले.
- राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद.
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद.
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार.
- 25 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार.
- IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही.
- पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार.
- पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार.
- 2019 पर्यंत रेल्वेतील सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध.
- ऊस उत्पादनासाठी ९ हजार कोटींची तरतूद.
- रेल्वे 1 लाख 31 हजार कोटींचा असणार, 55 हजार कोटी सरकार देणार.
- मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा 5 हजारने वाढवणार.
- दलितांच्या कल्याणासाठी ५२, ३९३ कोटी रुपयांची तरतूद.
- झारखंड, गुजरातमध्ये दोन एम्स रुग्णालये स्थापन करणार.
- IIT, मेडिकल सह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार.
- देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार.
- 2025 पर्यंत टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करू.
- दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद
- झारखंड आणि गुजरातमध्ये 'एम्स' स्थापन करण्यात येईल.
- तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना.
- गरोदर महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये भरण्यात येतील.
- 14 लाख अंगणवाडी सेंटर्समध्ये 500 कोटी रुपये खर्चून महिला शक्ती केंद्राची स्थापना करणार.
- २०२२ पर्यंत ५ लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट.
- जानेवारीपर्यंत विदेशी चलन 361 अब्ज डॉलर्स इतके होते जे 12 महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसे आहे.
- दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी ४८१८ कोटींची तरतूद. २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
- ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
- 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.
- 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य.
- ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार.
- कंत्राटी शेतीसाठी नवा कायदा लागू होणार.
- 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारण्यात आली.
- ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद.
- ग्रामीण, शेती क्षेत्रासाठी एकूण 1लाख 87 हजार 223 कोटींची तरतूद, मागच्यावर्षीपेक्षा 24 टक्के जास्त तरतूद.
- ६०० जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र.
- पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल इकॉनाॅमी
- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला
- शाळांमध्ये विज्ञानाच्या शिक्षणावर जोर देण्यात येणार.
- पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

गज चक्रीवादळ : ३ जणांचा मृत्यू , ८१,००० लोक विस्थापित

national news
गज चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या किनारपट्टीला बसला असून ३ जणांचा मृत्यू तर ८१,००० ...

Jio GigaFiber अद्याप अधिकृतपणे लॉन्च नाही झाला, तरी टॉप

national news
Jio GigaFiberला अद्याप देशात अधिकृतपणे लॉन्च केले गेले नाही आहे तरीही त्यापैकी एका ...

स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या

national news
बुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...

मराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच

national news
मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...

तृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना

national news
शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...