सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (16:13 IST)

12 वी नंतर चार्टड अकाउंटंट कसे व्हावे , पात्रता जाणून घ्या

chartered accountant
अनेक विद्यार्थ्यांचे बारावीनंतर सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट (CA)होण्याचे स्वप्न असतात. सीए करण्यासाठी खूप मेहनत आहे. चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचे अनेकांचे स्वप्न असते, पण सीए बनण्याची जिद्द आणि अभ्यास करण्याची इच्छा  ज्याच्यात असते. तेच या मध्ये यश मिळवतात. चार्टर्ड अकाउंटंटसाठी अनेक परीक्षा द्यावी लागते. सीएमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला तीन परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. सीपीटी (प्रवेश परीक्षा), आयपीसीसी (इंटरमीडिएट परीक्षा) आणि अंतिम सीए परीक्षा.
 
1 कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (CPT)- CA मध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (CPT) ने सुरुवात करावी लागेल, ती उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्ही सीए होण्याची एक पायरी चढू शकाल. तुमच्याकडे सीएच्या पेपरमध्ये अकाउंटिंग, मर्कंटाइल लॉ, जनरल इकॉनॉमिक्स आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड असे चार विषय असतील. या विषयांचे प्रश्न तुमच्या संपूर्ण पेपरमधून येतील. 
 
2 इंटीग्रेटेड प्रोफेशनल कंपीटेंस कोर्स (IPCC) - या पेपरमध्ये अकाउंटिंग, बिझनेस आणि कंपनी लॉ, एथिक्स अँड कम्युनिकेशन, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन, अॅडव्हान्स अकाउंटिंग, आयटी आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयांवर प्रश्न असतील. CPT पेपर क्लिअर केल्यानंतर, विद्यार्थी IPCC परीक्षेला बसू शकतात. पहिला पेपर क्लिअर केल्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी 9 महिने लागतात. 
 
अशी तयारी करा
सीएमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी सुरुवातीपासूनच तयारी करून घेतात. वाणिज्य शाखेत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अनेकदा चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न पाहतात. तर  काही लोक चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करण्यासाठी आधी ग्रॅज्युएशन करतात. सीएमध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था आणि लेखाविषयक सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
 
पात्रता
* चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करण्यासाठी 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
* 12वीला किमान 50 टक्के गुण वाणिज्य शाखेसाठी आणि 55 टक्के नॉन-कॉमर्ससाठी अनिवार्य आहेत. 
*  ग्रॅज्युएशननंतर चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी अर्ज करण्यासाठी 60 टक्के गुण असावेत.