गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (16:12 IST)

RRB MI Exam: परीक्षेत सामील होणार्‍या उमेदवारांची फीस होणार रिफंड, रेल्वेने मागविली बँक डिटेल

रेल्वे भरती बोर्डाने मंत्रिस्तरीय आणि पृथक श्रेणीच्या पदांसाठी कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) मध्ये सामील होणार्‍या उमेदवारांची परीक्षा फीस परत करणे सुरु करुन दिले आहे. जर आपण देखील या उमेदवारांपैकी एक आहात तर आपल्या आपलं बँक विवरण रेल्वेला पाठवावे लागेल. 
 
https://www.rrconline.in/mic_refund/ वर जाऊन उमेदवार आपली बँक डिटेल भरु शकतात. आरआरबीने नोटिस जारी करुन उमेदवारांना बँक डिटेल्स देण्यास सांगितले आहेत. 'अपडेट बँक अकाउंट लिंक' अॅक्टिव करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. जेथे उमेदवार आपल्या बँक अकाउंटची ‍डिटेल्स देऊ शकतात. उमेदवारांना ही सुविधा 2 मार्च सकाळी 10 वाजेपासून ते 17 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिळू शकेल. या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणिक बँक खात्याची माहिती देण्यासाठी एसएमएस आणि ईमेल पाठवण्यात येईल.
 
आरआरबीने उमेदवारांना सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की त्यांच्याद्वारे प्रदान करण्यात आलेले बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड प्रमाणिक आहे. फॉर्म जमा झाल्यावर बँक विवरणात संशोधन करणे शक्य नाही. म्हणून उमेदवारांनी सावध राहून माहिती भरावी. आपण चुकीची माहिती दिल्यावर रिफंड न मिळाल्यास आरआरबी जवाबदार राहणार नाही. 
 
ही भरती मंत्रिस्तरीय आणि पृथक श्रेण्या (स्टेनो, जूनियर अनुवादक आणि मुख्य कायदा सहायक) च्या 1663 रिक्त पदांसाठी केली जात आहे.