testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वाइनग्रेप उत्पादन, शेतकर्‍यांसाठी सुवर्ण संधी

farm
नाशिक- राष्ट्रीय स्तरावरील विचार करता द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा मोठा हात आहे. परंतु गेल्या काही वर्षात व यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु त्यावर पर्याय म्हणून टेबलग्रेपसोबतच वाइनग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत आहेत. वाइन उद्योगाच्या वाढत्या विस्तारासोबतच वाइनग्रेप पिकवत द्राक्ष उत्पादकांनाही चांगले उत्पादन मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
साधारणत: 2000 सालापासून भारतात बहरत गेला. देशात द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने विशेषतः: महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी जागतिक दर्जाच्या द्राक्ष उत्पादनाला सुरवात केली. भारतातील उष्णप्रदेशीय (ट्रॉपिकल) विभागात मोडणार्‍या नाशिकसह सांगली, सोलापूर, पुणे सातारा या जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकातील बिजपुर, बगलकोट, बेल्जियम, गुलबर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती आहे. देशातील द्राक्ष उत्पादनाच्या जवळपास 70 टक्के वाटा या परिसरातून येतो. तर 34,000 हेक्टर परिसरात द्राक्ष शेती केली जाते. या क्षेत्रातून 10 लाख टन केले जाते.
देशातील द्राक्ष उपत्पादनापैकी महाराष्ट्र राज्यात जवळपास 85 हिस्सा हा भारताचा असून महाराष्ट्रात पिकणार्‍या द्राक्षांत 60 टक्के द्राक्ष जिल्ह्यात उत्पादित केले जातात. याशिवाय पुणे, सोलापूर व सांगली येथेही द्राक्ष लागवड केली जाते. चांगले उत्पादन मिळवून देणारे पिक म्हणून द्राक्षाची ओळख असली तरी काही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागतो. द्राक्षमळा उभारणीसाठी लागणारी मोठी गुंतवणूक, द्राक्षमळ्याच्या व्यवस्थापनासाठी लागणारा मोठा खर्च, वातावरणात होणार्‍या बदलांमुळे द्राक्ष शेतीला बसणारा फटका, निर्यातीचे अत्यल्प प्रमाण, विपणनात येणार्‍या अडचणी आदी समस्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करतात.
मात्र गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादकांना हमखास उत्पन्न मिळवून देण्यासाठी वाइन ग्रेपने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकीकडे टेबल ग्रेप पिकवतांना अनेक शेतकर्‍यांकडून द्राक्षमळ्यातील निम्म्या भागात वाइनग्रेपची लागवड केल्याचे आढळते. तसेच गारपीट व अन्य कारणांमुळे जरी द्राक्षमळ्याचे नुकसान झाले, तरी अशा परिस्थितीत वाइनग्रेप वाइन उत्पादनासाठी वापरात येत असल्याने शेतकर्‍यांना‍ दिलासा मिळण्यासोबत हमखास उत्पन्नाचा मार्ग गवसला आहे.
वाइन उद्योगाचा वाढता विस्तार आकडेवारीतून लक्षात येतो. गेल्या वर्षी देशात 17 मिनीयन लीटर वाइनचे उत्पादन झाले. यामुळे निर्यातीचे प्रमाणही 40 टक्क्यांनी वाढले.

देशात वाइन ग्रहण करणारे ग्राहक साधारणत: उच्च श्रेणीतील आहेत, असे समजले जाते. दिल्ली मेट्रो आणि गोवा या ठिकाणी सुमारे 75 टक्के वाइन रिचवली जाते. मात्र अलीकडील काळात कमी दरात दर्जेदार वाइन उत्पादित होत असल्याने आता वाइन सेवन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर वाइन उद्योगही विस्तारत चालला आहे.
वाइनच्या वाढत्या मागणीमुळे वाइनच्या उत्पादनातही वाढत होते आहे. परिणामी वाइन उत्पादनासाठी लागणार्‍या वाइनग्रेप्सची मागणीदेखील सहाजीकरित्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मोठे वाइन उत्पादक करार शेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना भरघोस व हमखास उत्पन्न वाइनग्रेपद्वारे मिळवून देतायत.

पुढे वाचा....


यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...