यशाचे राज शाहरुखच्या शब्दात....

sharukh
WD
अभिनेत्री अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरवात करत आहे. याविषयी तुला काय वाटते?
खरं! सांगायचे झाल्यास मी जेव्हा पहिल्यांदा अनुष्काला भेटलो तेव्हा मला तिच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे दिसून आले. मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर उभा आहे की, मला युवा पिढीसोबत काम करण्याची संधी ‍मिळत आहे. तेव्हा मला असे वाटते की, मी वेगळ्या विचारसरणीचा आहे. अनुष्कासोबत काम करताना मला एक नवी दृष्टी मिळाली. माझी अभिनय करण्याची एक स्टाइल ठरलेली आहे. मला काही लोकांनी विचारले की, तुमच्यासोबत नवीन चेहरे काम करतात, त्यांना अभिनयाचे धडे तुम्ही शिकवले असतील. त्यानंतर मला अनुष्काजवळ जाऊन तिचे आभार मानावेसे वाटले.

sharukh
WD
आदित्य चोप्रांचा हा तिसरा चित्रपट असून तू त्यांच्या तीनही चित्रपटात काम केले आहेस. याविषयी तुला काय वाटते?
वेबदुनिया|
'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. वा...वा... लाजबाब... अशी प्रशंसा मिळवणारा 'रब ने बना दी जोडी' हिट झाली. घवघवीत यश प्राप्त केलेल्या या चित्रपटाबद्दल किंग खानच्या शब्दात ऐकूया!...

तू चित्रपट साइन करताना विचारपूर्वकच चित्रपट साइन करतो. मग 'रब ने बना दी जोडी' हा चित्रपट तुला का साइन करावा वाटला?
मी यशराज फिल्म्सचा चित्रपट साइन करताना कुठलाच विचार करत नाही. त्यांच्यात व माझ्यात होणार्‍या चर्चेतच चित्रपट साकरला जातो. यशजींच्या 'चल आजा पिक्चर कर ले!' असे सांगण्यात चित्रपट साइन होत असतो. जानेवारी महिन्यातील गोष्ट आहे. आदित्यने मला सांगितले की, त्याने माझ्यासाठी एक कथा लिहिली आहे. तेव्हा मी असा विचार केला की, जर त्याने माझ्यासाठी कथा लिहिली असेल तर तो मला नक्कीच सांगेल. आणि तसेच झाले. त्याने कथा मला दाखवली. मी कथा ऐकल्यानंतर 'वा क्या बात है।' असे म्हटल्यावर लगेच आदीने तीन महीन्यानंतर शूटिंगचा नारळ फोडायचा आहे, असे सांगितले. बस्स, मग या चित्रपटात माझे स्थान निश्चित झाले. बॉलीवुडमध्ये असे काही लोक आहेत की, त्यांचा चित्रपट साइन करताना मला काहीच विचार करावा लागत नाही. करण जोहर, फराह खान, यशजी व आदित्य जेव्हा मला विचारणा करतात तेव्हा मी त्यांना नाही म्हणत नाही.
'डर' या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आदित्य आणि माझी मैत्री झाली होती. तो या चित्रपटाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होता. आम्ही दोघे समान असून आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळेच आम्ही चांगले मित्र बनू शकलो. आदित्यप्रमाणे मी पण लाजाळू आणि एकांतप्रिय आहे. मी अभिनेता असल्यामुळे लोकांना माझ्याविषयी अधिक म‍ाहिती आहे. परंतु आदित्यविषयी म्हणावी तशी माहिती नाही. मी सेटवर नेहमी आदित्यला सर म्हणून बोलत असतो. मी आदित्यचे आभार मानू इच्छितो. कारण त्याने मला त्याच्या तिसर्‍या चित्रपटातही काम करण्याची संधी दिली. मला त्याच्या शेवटच्या चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे. याबाबत मी स्वत: ला भाग्यशाली समजतो की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी ...

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते