1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2010 (13:48 IST)

नेमबाजांच्या विजयाचे श्रेय सरकारचे- सोढी

खेळाडूंकडून असुविधांसाठी नेमहमीच सरकारला जबाबदार मानले जाते. आता चक्क खेळाडूंच्या यशाचे श्रेय त्यांनी सरकारला दिले आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत सात सुवर्णपदकांची कमाई केली असून, सरकारच्या मदतीनेच हे शक्य झाल्याचे मत रोंजन सोढी याने व्यक्त केले आहे.

सोढीने अशर नोरियासह डबल ट्रॅपमध्ये व वैय्यक्तीत मेडल मिळवले आहे.सरकारच्या मदतीनेच हे शक्य झाल्याचे त्याने म्हटले आहे.

दहा वर्षांपूर्वी राजवर्धन राठोडने अथेंस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक पटकावत नेमबाजांना दिलेल्या प्रोत्साहनाने या खेळाकडे पहाण्‍याचा दृष्टीकोण बदलल्याचे त्याचे म्हणणे आहे.