शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (09:38 IST)

राज्यात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण दाखल

23 thousand 365
राज्यात बुधवारी दिवसभरात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. दुसरीकडे ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
 
दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.