1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (09:31 IST)

राज्यात शुक्रवारी ३,९९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात शुक्रवारी ३,९९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८८,७६७ झाली आहे. राज्यात एकूण ६०,३५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,५७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, कल्याण डोंबिवली मनपा ९, नाशिक ५, अहमदनगर ४, जळगाव ४, पुणे ४, सोलापूर ५, सातारा ५, यवतमाळ ४, नागपूर ६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे ९, यवतमाळ २, अमरावती १, औरंगाबाद १, जळगाव १, नागपूर १, सातारा १ आणि सोलापूर १ असे आहेत.
 
शुक्रवारी ४,४६७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,७८,७२२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,१९,९६,६२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८८,७६७ (१५.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०३,८८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.