गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (07:24 IST)

राज्यात ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

3 thousand 15
राज्यात बुधवारी दिवसभरात ४ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली. तर, ३ हजार १५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ५८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
दरम्यान, राज्याती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९५.७ टक्क्यांवर पोहचले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत १,३९,५७,४६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १९ लाख ९७ हजार ९९२ (१४.३१ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ३२५ जण गृहविलगीकरणात असून, २ हजार २३० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.