1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:26 IST)

राज्यात ३ हजार ७९१ नवीन कोरोनाबाधित दाखल

3 thousand 791 new corona
राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडत आहे. मंगळवारी दिवसभरात १० हजार ७६९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर आतापर्यंत १५ लाख ८८ हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के झाले आहे. मंगळवारी राज्यात ३ हजार ७९१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९५ लाख ३६ हजार १८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २६ हजार ९२६ (१८.११टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ११ हजार ४ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, सध्या राज्यात एकूण ९२ हजार ४६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.