मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (09:58 IST)

राज्यात कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७७ हजार गुन्हे दाखल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. ३९ हजार ६६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २९ कोटी ९९ लाख १२ हजार ६८२ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ०५ ऑक्टोबर या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३७० (८९८ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ७१८
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
जप्त केलेली वाहने – ९६,५४७
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २२८ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५३ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.