शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (07:43 IST)

महाराष्ट्रात 33 हजार 470 नवे रुग्ण

राज्यात आ33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 29 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
 
कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्रालाकाहीसा दिलासा मिळाला आहे. कारण काल हा आकडा 44 हजारांच्या पुढे पोहोचला होता. राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आलेत. कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या कमी आहे.
मुंबईला दिलासा
मुंबईत आज 13 हजार 648 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजारांच्या पुढे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालपर्यत मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे पोहोचला होताय.मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत असल्याचे आढळून आले आहे.