शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:01 IST)

राज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित

राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी राज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे.
 
दरम्यान, ५३ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.३ टक्के एवढे झाले आहे.
 
तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
पुण्यात ५ हजार ३९५ करोनाबाधित आढळले, ४९ रूग्णांचा मृत्यू
 
पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ३९५ करोनाबाधित आढळले असून, ४९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या अखेर ३ लाख ४९ हजार ४२४ झाली आहे. तर आता पर्यंत ५ हजार ९५१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान  ४ हजार ३२१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर २ लाख ८९ हजार १२२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.