गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 4 डिसेंबर 2021 (09:04 IST)

राज्यात ७२०९ रुग्ण उपचाराधीन

राज्यात गेल्या काही दिवसांत आटोक्यात येत असलेला करोना प्रसार दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही गेल्या महिनाभरात उत्तरोत्तर घट होत आहे. सध्या राज्यात ७२०९ रुग्ण उपचाराधीन असून गेल्या आठवडाभरात सुमारे ११ टक्क्यांनी घट झाली आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडय़ात राज्यात राज्यात ५ हजार ८१४ रुग्णांची नव्याने आढळले, तर गेल्या आठवडाभरात यात आणखी घट झाली असून ४ हजार ४९८ रुग्ण आढळले आहेत.
 
राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही नोव्हेंबरपासून सातत्याने घट होत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यत राज्यात १० हजार २२४९ रुग्ण उपचाराधीन होते. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात यात आणखी घट होत रुग्णांची संख्या सुमारे ८ हजारापर्यत कमी झाली तर गेल्या आठवडाभरात हे प्रमाण सात हजारांपर्यत कमी झाले आहे.
 
राज्यात सर्वाधिक, १ हजार ९२३ उपचाराधीन रुग्ण मुंबईत असून त्या खालोखाल पुणे(१८७०), ठाणे(१०५७), नगर(८३३) आणि नाशिक(३२३) या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के उपचाराधीन रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत.