रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (15:43 IST)

देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम

देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एम्स कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. कोरोनाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. आतापर्यंत परदेशात झालेल्या संशोधनावर कोरोनाबाधितांवर उपचार केले जात होते. 
 
भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) कडून परवानगी मिळाल्यानंतर भोपाळमधील एम्सने केलेल्या संशोधनात संक्रमित मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. संशोधनात भोपाळमधील एम्समध्ये जवळपास १० कोरोनाबाधित मृतदेहांचे पोस्टमार्टम केले आहे. 
 
भारतात कोरोनाबाधितांच्या शरीरावर या व्हायरसचा परिणाम काय होतो याबाबत काहीच कल्पना नाही. याकरता संशोधन करण जास्त गरजेचं आहे. या संशोधनामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. जोपर्यंत व्हॅक्सीन मिळत नाही तोपर्यंत यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. रुग्णांच्या शरीरातील अवयव निकामी होण्यापासून रोखण्यास मदत केली पाहिजे.