वैष्णव देवी मंदिराच्या तीन पुजार्यांसह 22 जणांना कोरोनाची लागण
वैष्णव देवी मंदिराच्या तीन पुजार्यांसह 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात चार पोलीस, चार जवान आणि श्राईन बोर्डाच्या कर्मचार्यांचाही समावेश आहे.
तब्बल पाच महिन्यानंतर रविवारी वैष्णव देवीच्या यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर मंदिरातही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे.
मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाधल्याने कोविड सुविधा सुरू करण्यात आली. सर्व कोरोना रुग्णांना एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोमवारी 200 भाविकांनी वैष्णो देवीचे दर्शन घेतले आहे.