शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:18 IST)

राज्यात बुधवारी ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात बुधवारी ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ७६ हजार ९३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ६३१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. दिवसभरात ३ हजार ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात एकूण १९ लाख ८५ हजार २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के एवढा झाला आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमनुयांपैकी २० लाख ७६ हजार ९३ (१३.४३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील ३८ हजार १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.