शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (07:32 IST)

दिलासा : राज्यात शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

मुंबईनंतर राज्यात शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्य कमी झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या सुद्धा घटली आहे. मुंबईत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक वेळा शून्य कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातही शून्य कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी  २५१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १.८२ टक्के एवढा मृत्यूदर आहे.
 
तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२०,९२२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९% एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण २ हजार ५२४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर ७८ लाख ७१ हजार २०२ कोरोनाबाधितांची आजपर्यंत नोंद झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे या ठिकाणी अद्याप निर्बध शिथिल करण्यात आले नाही. केवळ अल्प प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत.
 
मुंबईत ४४ कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठा घट झाला असल्याचे दिसत आहे. रविवारीमुंबईत फक्त ४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे सर्व ठिकाणे १०० टक्क्यांनी सुरु करण्यात आले आहेत. मुंबईत रविवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून अनेक दिवस मुंबईतील कोरोनाबाधितांची नोंद शून्यावर होत आहे.