बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (16:51 IST)

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३ वर

राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ११ जणांपैकी १० जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आले आहेत. तर ३ जणांना करोनाची बाधा संसर्गातून झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं ते म्हणाले.
 
राज्य सरकारच्यावतीनं मेडिकल कॉलेजमध्येही आम्ही चाचणी केंद्र उभारण्यास तयार आहोत. आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही याबाबत विनंती केली आहे. आम्ही यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पाळू असंही त्यांना सांगितलं आहे. राज्यात चाचणी केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.