बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: चेन्नई , बुधवार, 25 मार्च 2020 (13:17 IST)

कोरोनामुळे भारतात ११वा बळी! तामिळनाडूत ५४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

Corona's 11th victim
लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात ११वा बळी घेतला आहेत. तामिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे.

कोरोनाचा विळखा 100 हून अधिक देशांना बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून महाराष्ट्रात सर्वाधिक 101 आकडा आहे.