मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (11:50 IST)

देशात कोरोना अनियंत्रित, नवीन रुग्णांची संख्या 27 हजार पार

देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. आज संपूर्ण देशात कोरोनाबाधितांची संख्या 27 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात एकूण 27553 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी शनिवारी देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोकादायक वेग दिसून आला होता. यामध्ये मुंबईत 6347, दिल्लीत 2716 आणि कोलकात्यात 2398 रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटच्या प्रकरणानेही वेग पकडायला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर येथील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1525 वर पोहोचली आहे. यामध्येही सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 460 आहे. 
दररोज झपाट्याने होणारी वाढ पाहता , दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुमारे 35 ते 36 टक्क्यांनी वाढ होत आहे. शनिवारी 24 तासांत देशभरात एकूण 22 हजार 775 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर या दिवशी 406 रुग्णांचा मृत्यू झाला असून 8949 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे 6347 रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला. सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की येथे 10 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. याशिवाय येथील 157 इमारतीही सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकूण 22,334 सक्रिय रुग्ण आहेत. ते होम क्वारंटाईन असून घरात राहूनच उपचार घेत आहे.