गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (23:54 IST)

Corona Virus : चिंचवडमध्ये कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

death corona positive
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून मंगळवारी चिंचवडच्या शाहू नगरच्या रुग्णालयात कोरोनाचा उपचाराधीन  एका 89 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.सदर माहिती रुग्णालयाने राज्यसरकारच्या पोर्टलवर दिली आहे. मागील काही महिन्यानंतर शहरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचा राज्यातील पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आढळला होता. कोरोनामुळे तब्बल 4 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी 9 मार्च पर्यंत शहरात एकही सक्रिय रुग्ण न्हवता पण आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. सध्या चिंचवड शहरात 200 पेक्षा अधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहे. 
 
 Edited By - Priya Dixit