Corona virus ची खासगी लॅबमध्येही मोफत चाचणी होणार
आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. यापूर्वी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी साडे चार हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती.
सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी रुग्णालयात ज्या प्रमाणे करोनाची चाचणी मोफत होते तशीच खासगी लॅबमध्येही करण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.