शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (18:54 IST)

कोरोना : 'होम आयसोलेशन'मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी काय करावं?

मयांक भागवत
'होम आयसोलेशन'मध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
 
या सूचना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या पण, लक्षणं नसलेल्या (asymptomatic) आणि ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा जास्त असलेल्या रुग्णांसाठी आहेत.
 
भारतात कोव्हिड-19 च्या त्सुनामीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढलीये. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 85 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.
'होम आयसोलेशन' मध्ये कोणते रुग्ण राहू शकतात?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचे 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पण, यातील बहुतांश रुग्णांना लक्षणं नाहीत. हे रुग्ण घरीच 'होम आयसोलेशन' मध्ये उपचार घेऊन बरे होतात.
 
सौम्य संसर्ग किंवा लक्षणं नसलेले कोरोनाग्रस्त
रुग्णांच्या घरी स्वत:ला विलगीकरण करण्याची सोय पाहिजे
रुग्णांची काळजी घेणारे 24 तास उपलब्ध पाहिजेत. नातेवाईक आणि रुग्णालय यांच्यात संपर्क महत्त्वाचा
हृदयरोग, मधूमेह, उच्चरक्तदाब, किडनीविकार, यकृताचा त्रास अशा सहव्याधींनी ग्रस्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सल्ल्याने घरी उपचार घेऊ शकतात
HIV, अवयव प्रत्यारोपण, कॅन्सरचे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी 'होम आयसोलेशन' मध्ये राहू नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच रुग्ण घरीच उपचार घेऊ शकतात
कोरोना रुग्णांची काळजी घेणारे आणि संपर्कात आलेल्यांनी कोरोना प्रतिबंध उपचार म्हणून हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन औषध घ्यावं
'होम आयसोलेशन' मध्ये असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
घरीच उपचार घेत असलेल्या कोरोनारुग्णांपासून कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे रग्णांनी योग्य काळजी घेतली पाहिजे अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे.
रुग्णाने एका खोलीत, कुटुंबातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींपासून दूर रहावं
हवा खेळती राहील अशा खोलीत राहावं. ताजी हवा आत येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात
ट्रिपल लेअर मास्क कायम घालावा. मास्क 8 तासांनी किंवा ओला झाल्यास बदला
रुग्णाची काळजी घेणाऱ्यांनी रुग्णाच्या खोलीत जाताना N-95 मास्क घालावा
सोडियम हायड्रोक्लोराईडने मास्कचं निर्जंतुकीकरण केल्यानंतर मास्क फेकून द्यावा
शरीरातील पाण्याची पातळी योग्य रहावी यासाठी भरपूर पाणी प्यावं, आराम करावा
रुग्णांनी आपल्या वस्तू इतरांसोबत शेअर करू नयेत
हात वारंवार साबण, सॅनिटायझरने किमान 40 सेकंद धुवावेत
ज्या गोष्टींवर वारंवार स्पर्श केला जातो अशा गोष्टींचं निर्जंतुकीकरण करावं
 
स्वत:ची तपासणी कशी करावी?
पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेव्हल तपासावी. ऑक्सिजनची पातळी 95 पेक्षा जास्त असेल तर सामान्य आहे. ऑक्सिजन 95 पेक्षा कमी असेल तर तात्काळ डॉक्टरांना संपर्क करावा.
पल्स ऑक्सिमीटर वापरण्याआधी आणि नंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.
घरी थर्मल गन असेल तर हातापासून 6 इंच दूर ठेवून शरीराचं तापमान मोजावं. शरीराचं तापमान 100.4 (38) पेक्षा जास्त असेल तर ताप असल्याचं समजावं.
मॉनिटरिंग चार्ट कसा तयार करावा
दर चार तासांनी शरीरांचं तापमान, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनची पातळी, श्वास घेण्यास त्रास होतोय का नाही याचा एक चार्ट तयार करावा.
रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी सूचना-
कोरोनारुग्णाच्या खोलीत जाताना ट्रिपल लेअर मास्क किंवा शक्यतो N-95 मास्क वापरा
मास्कच्या समोरील बाजूला स्पर्ष करू नये
मास्क ओलं झाल्यास तातडीने बदलावं
रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांनी चेहरा, नाक किंवा तोंडाला हात लावू नये
रुग्णाची मदत करताना हातात ग्लोव्ज घालावेत
सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांवर उपचार -
रुग्णांनी डॉक्टरांसोबत संपर्कात रहावं
सहव्याधींनी ग्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत रहा
कोमट पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा वाफ घ्या
डॉक्टरांना दिलेली औषध वेळेवर घेत रहा