शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (18:29 IST)

मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी लोकांना कोवॅक्सीन चा डोस मिळाला नाही

मुंबईमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील लसीकरण केंद्रावरून अँटी कोरोनाव्हायरसची लस कोवॅक्सीन न मिळाल्यामुळे लसीकरण केंद्रावरून लोकांना निराश होऊन परतावे लागले.हे लोक लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस घेण्यास आले होते.   
 
बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) यांनी सोमवारी ट्विटरवर लस डोस उपलब्ध असलेल्या 105 लसीकरण केंद्रांची यादी सामायिक केली, परंतु या केंद्रांवर केवळ कोव्हीशिल्डच लस डोस उपलब्ध आहेत.
 
यापूर्वी रविवारी लसीकरण मोहिमेवरही कोवॅक्सीन डोस नसल्याने मोहिमेवर परिणाम झाला होता. कोवॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या संतप्त लोकांनी नाराजी जाहीर केली.अनेकांनी सांगितले की त्यांनी 42 दिवसापूर्वीच लसीचा पहिला डोस घेतला होता. 
 
लसीकरणासंदर्भात सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोवॅक्सीन  लसच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोस दरम्यान चार ते सहा आठवड्यांचा अंतराल असावा तर कोव्हीशील्ड  लसीच्या दोन्ही डोसमध्ये चार ते आठ आठवड्यांचा अंतर असू शकतो.
 
बीएमसीच्या अहवालानुसार मुंबईतील 1,76,505 लोकांनी कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्या पैकी 1,20,167 लोकांनी लसीचा पहिला डोस तर, 56,338 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे. 
या अहवालानुसार मुंबईत आतापर्यंत 27,00,431 लोकांनी कोविड-19 ची लस देण्यात आली असून त्यापैकी 20,52,963 लोकांनी लसीचा पहिला डोस तर 6,47,468 लोकांनी दोन्ही लस डोस घेतल्या आहे. 
 
सध्या मुंबईत एकूण 175 लसीकरण केंद्र आहेत, त्यापैकी 81 केंद्रे बीएमसी द्वारे कार्यरत आहे. तर 20 राज्य सरकार आणि 74 खाजगी लसीकरण केंद्रे आहे.