शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (17:58 IST)

'ही' औषधे कोरोनावर यशस्वी ठरत असल्याचा दावा

जामिया मिलिया इस्लामियाच्या सेंटर फॉर इंटर-डिसिप्लिन रिसर्च इन बेसिक सायन्सेस (सीआयआरबीएससी) येथील शास्त्रज्ञ कोविड -१९ व्हायरसच्या औषधाच्या शोधावर संशोधन करण्यात यशस्वी झाले आहेत. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हेपेटायटीस सी आणि एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करणारी औषधं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देखील उपयोगी ठरू शकतात.
 
ही दोन्ही औषधं कोरोना रूग्णांच्या उपचारांकरता प्रभावी आहेत, मात्र प्रथम त्याची क्लिनिकल चाचणी घेतली पाहिजे, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तसेच जामियाच्या संशोधनाला प्रतिष्ठित जर्नल बायो सायन्स रिपोर्टकडून देखील मान्यता मिळाली आहे.