भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ पहिल्या टप्प्यात यशस्वी

Last Modified शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:19 IST)
देशातील कोरोनावर लस विकसित करणारी भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे.

कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच भारताच्या १२ शहरांमधील ३७५ स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचे १२ शहरांमध्ये परीक्षण केले जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे.
पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्सिनवर संशोधन करणाऱ्या सविता वर्मा म्हणाल्या की, कोवॅक्सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

शेतकरी आंदोलन : शिवसेनेचा एकही नेता आझाद मैदानावरील शेतकरी ...

शेतकरी आंदोलन : शिवसेनेचा एकही नेता आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनात सहभागी का झाला नाही?
मुंबईतल्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकरी मोर्चात शिवसेनेचे नेते दिसले नाहीत. केंद्र ...

ग्रामपंचायत निवडणूक : अजून एकाही गावात सरपंच पदावर कुणी ...

ग्रामपंचायत निवडणूक : अजून एकाही गावात सरपंच पदावर कुणी विराजमान का झालं नाही?
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. ...

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना ...

देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र: सौ. विमलबाई गरवारे ...

देशातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र: सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे ‘मएसो सुबोधवाणी’ हे वेब ...

गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी : ...

गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी : अबू आझमी
नव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. ...