रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 31 जुलै 2020 (15:52 IST)

कोरोनाव्हायरस Live Updates: एका दिवसात 55,079 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 779 मरण पावले

देशात कोरोनाव्हायरसच्या झपाट्याने वाढत चाललेल्या घटनांमध्ये सरकारने पुन्हा एकदा कम्युनिटी ट्रांसमिशन होण्याचे अनुमान फेटाळून लावले. देशातील कोरोना रूग्णांच्या पुनर्प्राप्तीचे प्रमाणही वाढून 64.44%  झाले आहे, तर मृत्यूचे प्रमाण 2.21 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. कोरोनाव्हायरसशी संबंधित प्रत्येक माहिती ...


03:51 PM, 31st Jul
ठाकरे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस 
“ठाकरे सरकार (Thackeray Government) पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
“आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं वाटत नाही.

02:15 PM, 31st Jul
व्हेंटिलेटर बंद पडल्याने बीडमध्ये करोना रुग्णाचा मृत्यू
बीडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांची तडफड सुरू आहे तर नातेवाईकांची धावपळ सुरू असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 72 वर्षीय रुग्णाचा मृत्यू कृत्रिम श्वसन यंत्र बंद पडल्यानेच झाल असा आरोप करत चौकशीची मागणी मृत रुग्णाच्या मुलाने केली आहे. 


01:22 PM, 31st Jul
‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात लॉकडाउन आणि अनलॉकवर बोलताना राज ठाकरे यांनी टीका केली  
“२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज जेव्हा आपण आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थितीत समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं.
 
आपण आता लॉकडाउन किती काळ चालवणार आहोत. लोकांना आपली नोकरी आहे की नाही याबाबतहबी शंका आता निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या  कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली.

11:56 AM, 31st Jul

नवी मुंबईत दहा हजार रुग्ण कोरोनामुकत
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी त्यासोबत कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही दिवसेंदिवस वाढू लगली आहे. शहरात गुरुवारी ३६२ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १० हजार ११६ झाली आहे. ६७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश आले असून यापुढे ही टक्केवारी वाढवून दुसरीकडे मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.