क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये

नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 1 एप्रिल 2020 (12:57 IST)
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील घरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. 23 मार्चला स्मृती मुंबईवरुन सांगलीला परतली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिला होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देणत आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर तिच्या तब्बेतीकडे

लक्ष ठेवून आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत
सांगली जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत परदेशातून आलेल्या सुमारे 200 लोकांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मृती ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकात सहभागी झाली होती. ही स्पर्धा संपल्यानंतर ती मुंबईत आली. जगभरासह भारतात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाल्यानंतरही स्मृती मुंबईतल्या घरी होती. यानंतर 23 मार्चला ती सांगलीतल्या आपल्या घरी आली.

महापालिकेच्या अधिकार्‍यांना 25 मार्चला ही माहिती समजताच त्यांनी तिला क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिल्याचे सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितलं.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकलले आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणे योग्य नसल्याचे मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केले होते.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा, काळा बाजार करतांना दोघांना अटक

रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा, काळा बाजार करतांना दोघांना अटक
रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक ...

सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर 50 हजार पार

सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर 50 हजार पार
कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे मुंबईत ...

वादानंतर आता तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवला

वादानंतर आता तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवला
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाहीर ...

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाही

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाही
जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ६३ लाखांहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ५ लाख ६३ ...

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके ...

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?
आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी किसान क्रेडिट ...