गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (09:12 IST)

डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग

Dr. Mandakini Amte
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 
 
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवण्यात येतो. प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटुंबीय हे हेमलकसा येथे वास्तव्यास असतात. तसेच प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे हे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.