1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (22:18 IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

1 शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
2 हिंसा ही वाईट गोष्ट आहे त्या पेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे गुलामी आहे.
 
3 काम लवकर करावयाचे असल्यास, मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
 
4 माणूस हा धर्म साठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
5 ग्रंथ हेच गुरु.
 
6 वाचाल तर वाचाल.
 
7 तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
 
8 मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
9 तुम्ही वाघा सारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
 
10 ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
 
11 शक्तीचा उपयोग काळ-वेळ पाहून करावा.
 
12 नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
13 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
14 जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
 
15 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 
16 प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
17 स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
18 एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
 
19 धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
 
20 जो माणूस मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.