शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (14:59 IST)

मोठमोठे राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात

भारतातील कोरोनाच्या अनियंत्रित वेगापासून सामान्य किंवा विशेष कोणीही वाचू शकत नाहीये. गेल्या काही दिवसांत बड्या राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंगदेव, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 10 जण मंत्री तसेच राज्यातील 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि त्यांचे कुटुंबीय, अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, भाजप खासदार मनोज तिवारी, बिहारचे मंत्री शाहनवाज हुसेन आणि इतर अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीही कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकल्या नाहीत.
 
काही दिवसात राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत या दोन नेत्यांचा समावेश आहे. खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. भारती पवार यांनी काही दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी दौरे केले होते. तसेच यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील घेतल्या होत्या.