मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (19:42 IST)

घाबरू नये, कोरोनाच्या तिसऱ्या लाटीचे मुलांवर कोणतेही परिणाम होणार नाही - रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले आहेत की कोरोनाव्हायरसच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम मुलांवर होणार नाही. म्हणून, याची भीती बाळगण्याची गरज नाही.
गुलेरिया यांनी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा मुलांवर संक्रमणाचा फारसा परिणाम झाला नाही. अशा परिस्थितीत, तिसऱ्या लाटेत मुलांवर  कोरोनाचा जास्तीत जास्त परिणाम होईल असे म्हणणे योग्य नाही.
ते म्हणाले की मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याच्या माहिती संदर्भात, बालरोगशास्त्र संघटनेने म्हटले आहे की ही माहिती वस्तुस्थितीवर आधारित नाही. म्हणून, याची अनावश्यकपणे भीती बाळगण्याची गरज नाही.
उल्लेखनीय आहे की राजस्थान, उत्तर प्रदेशसह काही राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. या आधारावर, काही तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.