गणेशोत्सवाची गर्दी धोक्याची असू शकते,आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
गणेशोत्सव आणि इतर येणाऱ्या सणांमध्ये जमवलेली गर्दी ही धोकादायक असू शकते.हा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे.सण उत्सवानिमित्त जमवलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकते.असं केल्याने कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो.
सध्या पुन्हा काही राज्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे. आता सण देखील सुरु झाले आहे.सणानिमित्ताने बाजार पेठेत होणारी गर्दी ही कोरोनाच्या प्रकरणात वाढ करण्यासाठी पुरेशी आहे. आपण केलेला निष्काळजीपणा आपल्याला धोक्यात टाकू शकतो.म्हणून शक्यतो गर्दीत जाणे टाळा.कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करा. सामाजिक अंतर राखा. मास्क चा वापर करा.हाताला वारंवार धुवा. सेनेटाईझरचा वापर करा. अशी सूचना आरोग्य मंत्रालय देत आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा.
नीती आयोगाचे अध्यक्ष डॉ.व्ही.के.पॉल म्हणाले की आपली केलेली एक चूक देखील आपल्यासाठी महागात पडू शकते. गर्दी मुळे कोरोनाचे संसर्ग वाढू शकते.आणि ते भयावह होऊ शकते. म्हणून खबरदारी घ्या. लसीकरणाबद्दल जागरूक व्हा.लसीकरण घ्या.सध्या केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने डोकं उंच केले आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे.आणि ज्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस घ्यावा.असे आवाहन डॉ.पॉल यांनी केले आहे.