शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:48 IST)

दिवाळीपूर्वी महाराष्ट्रासाठी आनंदीची बातमी,रुग्णसंख्या एक हजारांच्या आत

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, दिवाळीपूर्वी महाराष्ट्रासाठी आनंदीची बातमी समोर आली आहे. राज्यात आज (सोमवारी) एक हजाराहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी  889 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 1 हजार 586 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 03 हजार 850 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 37 हजार 025 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.46 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 25 हजारांच्या खाली आली असून, सध्या 23 हजार 184 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 40 हजार 028 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
 
राज्यात आतापर्यंत 6 कोटी 19 लाख 78 हजार 155 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 957 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 83 हजार 092 जण होम क्वारंटाईन आहेत.