मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:17 IST)

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Minister Gulabrao Patil infected with Corona
देशभरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बऱ्याच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यात आता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांनी स्वत; ट्विट करून माहिती दिली.
शिवसेनेचे जळगाव मधील आमदार तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोरोना रीपोर्ट पाॅझिटीव्ह आला असून ह्याबाबतची माहिती स्वतः गुलाबराव पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यांची प्रकृती चांगली असून ते गृहविलगीकरणात असल्याचे समजते आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे व लक्षणे आढळल्यास कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.